ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाऊ शकतो रोहित शर्मा

Rohit Sharma

बीसीसीआय (BCCI) ११ नोव्हेंबरला रोहितला (Rohit Sharma) देखील भारतीय (Indian) संघासह ऑस्ट्रेलिया (Australia) दौर्‍यावर पाठवू शकतो. मुंबई इंडियन्ससाठी मैदानात उतरल्यानंतर बीसीसीआयच्या रोहितच्या फिटनेसबाबतच्या आशा वाढल्या आहेत. मर्यादित षटकांत भारताचा उपकर्णधार, उर्वरित संघासह ११ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी चार्टर्ड विमानात जाऊ शकतो.

यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. फिजिओ नितीन पटेल आणि ट्रेनर निक वेब यांच्या देखरेखीखाली रोहित संघाबरोबर राहून त्याच्या स्ट्रेंथ आणि कंडिशनिंगवर काम करणं योग्य ठरेल. गरज भासल्यास रोहितला २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी संघातून वगळता येऊ शकते आणि टी -२० आंतरराष्ट्रीय मालिकेतून तो माघारी येऊ शकेल. कसोटी मालिकेपर्यंत तो पूर्ण तंदुरुस्त होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER