रोहित शर्मा बनला ‘सिक्सर किंग’

Rohit Sharma

मुंबईचा (MI) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा आयपीएलमध्ये (IPL) सर्वाधिक षटकार (Sixes) ठोकणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये आता २१७ षटकार असून त्याने सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. धोनीच्या नावावर २१६ षटकार तर विराट कोहलीच्या नावावर २०१ षटकार आहेत. सुरेश रैनाने १९८ षटकार लगावले आहे.

आयपीएलमधील सर्वच खेळाडूंचा विचार केला तर सर्वाधीक षटकार लगावणाऱ्या ख्रिस गेलच्या तुलनेत मात्र रोहित बराच मागे आहे. ख्रीस गेलने तब्बल ३५१ षटकार लगावले आहेत. तर एबी डी विलीयर्सने २३७. त्यानंतर रोहित शर्माचे नाव येते.

आयपीएलमध्ये २०० च्या वर षटकार

  • ३५१ – ख्रीस गेल
  • २३७ -एबी डीविलीयर्स
  • २१७ – रोहित शर्मा
  • २१६ – एम.एस.धोनी
  • २०१ – विराट कोहली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button