रोहित पवार प्रवीण दरेकरांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

Maharashtra Today

मुंबई :- एकीकडे सचिन वाझे (Sachin Vaze) याच्या अटकेनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं असताना आज मोठी घडामोड दिसून आली. एरवी विरोधीपक्षातील नेत्यांना टार्गेट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांची भेट घेतली. रोहित पवार चक्क प्रवीण दरेकर यांना भेटल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही नेत्यांची आज सकाळी भेट झाली. भेटीच नेमकं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. प्रवीण दरेकर यांचं सरकारी निवासस्थान अवंती इथे जाऊन रोहित पवार यांनी ही भेट घेतली. प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे संचालक आहेत. रोहित पवार यांचं त्यासंबंधित काही काम होतं का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील संबंध राज्याला माहिती आहेत. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती आणि सचिन वाझे प्रकरण पाहता, भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. अशा परिस्थितीत रोहित पवार यांनी थेट विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER