रोहित पवारांचा भाजपाला दणका, कर्जत-जामखेडमधील ५ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Rohit pawar

अहमदनगर : कर्जत-जामखेड मतदार संघातील भाजपाचे (BJP) ५ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटात सहभागी झाले आहे. त्यात कर्जतमधील 3 तर जामखेडमधील 2 भाजप नगरसेवकांचा समावेश आहे. जामखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासह भाजपाच्या तीन नगरसेवकांनी माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांची साथ सोडत भाजपा सोडली. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपाला जोरदार दणका दिला आहे.

मागील चार वर्षांपासून जामखेड नगरपरिषदेमध्ये भाजपाचे सहयोगी सदस्य असलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. भाजपाला कर्जत पाठोपाठ जामखेड येथे गळती लागली आहे.

विश्रामगृहावर कर्जत – जामखेड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुभाष आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुर्यकांत मोरे, तालुका उपाध्यक्ष दयानंद कथले, सतीश चव्हाण, बापूराव शिंदे, अमोल जावळे, पिंटू काळे, अशोक धेंडे दादासाहेब भोरे, अमित जाधव, असिफ शेख यांच्या उपस्थितीत जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व नगरसेवक महेश निमोणकर, मोहन पवार, राजेश वाव्हळ या तिनही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत घोषित केला.

नगरसेवक महेश निमोणकर म्हणाले मी अपक्ष निवडून येऊन भाजपला विनाशर्थ पाठिंबा दिला होता. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे यांचे काम केले होते तरीही भाजपावाले मला त्यांचा समजत नव्हते. शहराचा खुंटलेला विकास यामुळे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून राष्ट्रवादीचे आ. रोहीत पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिनही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ संघाचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, आ. रोहीत पवार यांनी मतदारसंघात जनतेला विश्वासात घेऊन आपले काम सुरू केले आहे. तीन विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने पक्षाचे वाढत आहे. लवकरच आ. रोहीत पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER