रोहित पवारांचा नकलीपणा बघायचा असेल तर हे वाचा, निलेश राणेंची बोचरी टीका

Nilesh Rane - Rohit Pawar

मुंबई :- मोदी सरकारने (Modi Government) नव्याने मंजूर केलेल्या कृषि कायद्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) दंड थोपाटला आहे. स्वतः शरद पवार (Sharad Pawar) यांनी यासंदर्भात विरोधाची भूमिका घेतली आहे. अशा पार्श्वभूमीवर बारामती ॲग्रो कंपनीच्या करार शेतीचे बॅनर व्हायरल झाल्यानंतर माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत रोहित पवारांवर (Rohit Pawar) निशाणा साधला आहे.

ही बातमी पण वाचा : शेतकरी कुठलाही असो त्यांना सन्मानाची वागणूक द्या –  रोहित पवार   

त्यांनी बारामती ॲग्रोच्या करार शेतीचे फोटो ट्विट केले आहेत आणि रोहित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER