अन् ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर रोहित पवारांना अश्रू अनावर

Rohit Pawar

मुंबई :  झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली . येत्या १४ ते १६ डिसेंबरपर्यंत या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तरुण तडफदार नेतेमंडळी हजेरी लावणार आहेत. भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) , भाजपा (BJP) खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार थुकरटवाडीत येणार आहेत.

या भागात ‘पोस्टमन काका’ सागर कारंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या समस्या आणि त्यांचे दुःख सांगणारं पत्र सादर केलं आणि ते पत्र ऐकताना रोहित पवारांचे (Rohit Pawar) डोळे पाणावले. या पत्राला हे तीनही नेते काय उत्तर देणार हे प्रेक्षकांना कार्यक्रमात पाहायला मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER