‘मला गावांचा विकास करायचा आहे’, राम शिंदेंच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election) बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यावरून भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. गावात गटतट नसावेत असा माझा प्रामाणिक उद्देश आहे पण त्यांचा उद्देश गटतट असावेत असा आहे. मला राजकारण नाही तर गावांचा विकास करायचा आहे, असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी शिंदे यांना दिलं.

गावात गटतट असावेत असावे असा प्रामाणिक हेतू त्यांचा असावा मात्र माझा हेतू गटतट नसावेत असा आहे. गावच्या विकासासाठी सर्व लोक एकत्र येत असतील तर त्याला काय हरकत आहे.

बक्षीस जाहीर करण्यापाठीमागे माझा प्रामाणिक हेतू होता की गावकऱ्यांनी गटतट विसरुन विकासाचं राजकारण करावं. त्यांना विकासचं काम कळत नसेल. त्यांना गटतट कळत असतील तर त्याला मी काय करु, असा टोला रोहित पवार यांनी राम शिंदे यांना लगावला.

एकतर राम शिंदे काय बोलतात त्यापेक्षा लोकांना काय पाहिजे, हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे. लोकांच्या हिताच्या दृष्टीनेच मी या पुढे काम करत राहील, असं रोहित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER