रोहित पवारांकडून पंतप्रधान मोदींच कौतुक, केली ही विनंती

Rohit Pawar - PM Narendra Modi

मुंबई :- भारत (India) आणि जपान (Japan) यांच्यात झालेल्या कौशल्य हस्तांतरण कराराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच कौतुक केले आहे. केंद्र सरकारने (Central Government) जपानशी केलेला हा करार स्वागतार्ह पाऊल असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र, या करारातून उपलब्ध होणाऱ्या संधीचा सर्व राज्यांना समान लाभ मिळावा, अशी विनंतीही रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे.

ही बातमी पण वाचा : एमपीएससीसाठी खुल्या प्रवर्गाची कमाल मर्यादेची अट रद्द करा – रोहित पवार

या करारामुळे भारत आणि जपान यांच्यातील भागीदारी आणि सहकार्याला संस्थात्मक चौकट प्राप्त होणार आहे. त्यामुळे आवश्यक तंत्रज्ञान आणि जपानी भाषा अवगत असणाऱ्या भारतीय तरूणांना जपानमधील 14 विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. परिणामी भारतातील कुशल मनुष्यबळ जपानमध्ये पाठवणे सोपे होईल. मात्र, हे करताना देशातील प्रत्येक राज्यातील तरुणांना समान संधी मिळावी, अशी माझी तुमच्याकडे विनंती असल्याचे रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींना म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER