पवार कुटुंबातील ‘या’ मातोंश्रींनीही कसली कंबर ; मुलाला आईची साथ

Sunanda Pawar - Rohit Pawar

मुंबई :- आपला मुलगा कुठल्याही क्षेत्रात असला तरी त्याला आईची त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहते . साथ असतेच. असंच उदाहरण पवार कुटुंबियातून समोर आले आहे. अहमदनगरला कर्जत शहर स्वच्छ सर्वेक्षण या अभियानात उतरलं असून यात चक्क आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मातोश्री सुनंदा पवार (Sunanda Pawar) यांनी सहभाग नोंदवला आहे.

सुनंदा पवार सध्या कर्जत आणि जामखेडच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सर्वांच्या एकजुटीने काम करीत आहेत.यावेळी जनतेच्या हितासाठी आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी काम करत असताना त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आमदार रोहित पवार सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. तर त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्या मातोश्री देखील पुढे सरसावल्या आहेत. यामुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मतदारसंघाचे नाव उंचावण्यासाठी सुनंदा पवार स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER