“बबड्याची सीरिअल बघण्यापेक्षा”; रोहित पवारांचे आशिष शेलारांना खरमरीत प्रत्युत्तर

Ashish Shelar-Rohit Pawar

मुंबई : अंतिम वर्षांच्या परीक्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं (Supreme court) दिलेल्या निकालानंतर भाजपा (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी “एका ‘बबड्या’च्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला,” असं म्हणत सरकारवर टीकेचा बाण सोडला होता. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शेलार यांना खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे.

“आमची परीक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहिल. पण बबड्याची सीरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं,” असं म्हणत रोहित पवार यांनी आशिष शेलार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान, एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला…त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला…आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला! असे म्हणत आशिष शेलार यांनी राज्य सरकारला लक्ष्य करत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER