दिलखुलास रोहित पवार, रस्त्यावरील हातगाडीवर स्वत: बनवली अंडा भुर्जी

Rohit Pawar

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे साध्या राहणीमानामुळे युवकांचे आकर्षण ठरत आहेत. रोहित पवार यांनी मंगळवारी सायंकाळी नवी मुंबईचा फेरफटका मारला. यावेळी त्यांनी एका अंडा भुर्जीच्या हातगाडीवर स्वत: अंडा भुर्जी बनवली. रोहित पवारांचं हे नवं रुप पाहून सर्वच आवाक झाले. एक आमदार रस्त्यावरील अंडा भुर्जीच्या हातगाडीवर स्वत: अंडा भुर्जी बनवतो हे पाहून सर्वच आवाक झाले.

याबाबत आमदार रोहित पवारांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली. “नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला.यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही.शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला”, असं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER