रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात उभारले १,७५० बेड्सचे कोविड रुग्णालय

Rohit Pawar - Covid Beds - Maharastra Today
Rohit Pawar - Covid Beds - Maharastra Today

अहमदनगर :- मतदारसंघात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कोविड सेंटर उभारल्याची माहिती दिली होती. मतदारसंघातील रुग्णांना उपचारासाठी त्रास होऊ नये, यासाठी रोहित पवारांनी (Rohit Pawar) पुढाकार घेत हे सेंटर उभारले आहे.

रोहित पवार यांनी फेसबुकवरून कर्जतमध्ये ३५० बेड्स असलेल्या कोविड सेंटरचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच ते कोविड सेंटर हे उद्याच रुग्णांसाठी सुरू होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनावरून मोठ्या प्रमाणात राजकारण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच रोहित पवारांनी उचललेलं हे पाऊल अत्यंत स्तुत्य असल्याचं बोललं जात आहे. रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील कर्जतमध्ये एकूण ९०० बेड्स तर जामखेडमध्ये एकूण ८५० बेड्स कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. एकीकडे कोरोनाकाळात राजकारण सुरू असताना दुसरीकडे रोहित पवारांसारखे संवेदनशील राजकारणी नागरिकांप्रती असलेली तळमळ आपल्या कामामधून दाखवून देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button