रोहित ठरलाय षटकारांचा बादशहा

Rohit Sharma
  • तीन वर्षांपासून सर्वाधिक षटकार
  • ख्रिस गेललाही टाकले मागे
  • पहिल्या 10 षटकात सर्वाधिक धावा

राजकोटला बुधवारी भारताच्या बांगलादेशवरील विजयात कर्णधार रोहित शर्मा चमकला. आपल्या 43 चेंडूतील 85 धावांच्या खेळीने तो भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. यादरम्यान रोहितने दोन असे विक्रम केले ज्याची फारशी चर्चा झाली नाही.

ही बातमी पण वाचा:- एकही धाव न देता चार बळी, रोझमेरीची भन्नाट कामगिरी

यापैकी पहिला विक्रम म्हणजे 85 धावांच्या या खेळीदरम्यान पहिल्या 10 षटकांअखेर त्याच्या नावावर 79 धावा होत्या. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्या 10 षटकात कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. यादरम्यान रोहितने ख्रिस गेलच्या 2015 मधील 75 धावांच्या खेळीचा विक्रम मागे टाकला.

टी-20 इंटरनॅशनल सामन्यात पहिल्या 10 षटकांअखेर वैयक्तिक सर्वाधिक धावा

79- रोहित शर्मा- भारत वि. बांगलादेश- 2019
75- ख्रिस गेल- विंडीज वि. द. आफ्रिका- 2015
74- मो. शहजाद- अफगणिस्तान वि. युएई- 2015
74- पॉल स्टर्लिंग- आयर्लंड वि. झिम्बाब्वे- 2019
73- जेसन रॉय- इंग्लंड वि. न्यूझीलंड- 2016

रोहितचा दुसरा विक्रम म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार त्याच्या नावावर आहे. 2017 मध्ये त्याने 65, गेल्या वर्षी 74 आणि यंदा आतापर्यंत 66 षटकार लगावले आहेत आणि एवढे षटकार इतर कुणीही लगावलेले नाही. त्यामुळे रोहित हा षटकारांचा बादशहा ठरलाय यात शंका नाही. याबाबतीत जगप्रसिध्द असलेल्या विंडीजच्या ख्रिस गेललासुध्दा त्याने मागे टाकले आहे.

गेल्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

2017
फलंदाज सामने षटकार
रोहित शर्मा – 32 65
एव्हीन लुईस- 29 45
हार्दिक पंड्या- 42 44

2018
रोहित शर्मा 42 74
शेरॉन हेटमेयर 31 50
आरोन फिंच 33 45

2019
रोहित शर्मा 38 66
ख्रिस गेल 19 58
इयान मॉर्गन 29 58

गेल्या तीन वर्षात रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लगावलेले षटकार

वर्ष कसोटी वनडे टी20 एकूण
2019 19 30 17 66
2018 4 39 31 74
2017 3 46 16 65