माहित्येय का, धोनीच्या दुप्पट विजेतेपदं आहेत रोहित शर्माच्या नावावर!

Rohit Sharma - MS Dhoni

इंडियन प्रीमियर लिगच्या (IPL) 14 व्या सत्राला शुक्रवारी चेन्नईत (Chennai) सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्स (MI) वि. रॉयल चॕलेंजर्स बंगलोर (RCB). या लढतीने बिगूल वाजणार आहे. यासह मुंबई इंडियन्स आणि त्यांचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा आयपीएल विजेतेपदाचा षटकार मारण्याच्या प्रयत्नात असल्याचे सर्वश्रूत आहे. मुंबईने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलेले आहे. पण रोहित शर्माच्या नावावर सहा विजेतेपदं आहेत हे बहुतेकांना माहित नसेल. महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नावावर तीनच विजेतेपदं आहेत आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर सहा आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर तर शून्य! मुंबई इंडियन्सच्या नावावर पाचच विजेतेपदं असताना रोहित शर्माच्या नावावर सहा…हे कसे काय?

तर आयपीएलच्या पहिल्या तीन सत्रात म्हणजे 2008, 09 आणि 2010 मध्ये तो डेक्कन चार्जर्सकडून खेळला होता आणि त्यादरम्यान 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सचा संघ विजेता ठरला होता. हे रोहित शर्माचे पहिले आयपीएल विजेतेपद होते. त्यानंतर 2011 पासून तो मुंबई इंडियन्सकडे आला आणि 2013 मध्ये कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नात त्याने मुंबई इंडियन्सला यश मिळवून दिले. तेंव्हापासून मुंबईची पाच विजेतेपदं रोहितच्याच नेतृत्वात आहेत. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये मुंबई इंडियन्सने आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे.

याप्रकारे रोहित हा सहा विजेतेपदांसह आयपीएलमध्ये ‘सुपर हिट’ आहे आणि त्याच्याएवढी विजेतीपदे कुणाच्याही नावावर नाहीत. त्याचे सहकारी किरोन पोलाॕर्ड, आदित्य तारे व जसप्रीत बुमरा यांच्या नावावरही पाच विजेतेपदं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button