
सरावाचा अभाव आणि दुखण्यातून सावरण्यास लागणारा अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी यामुळे रोहित शर्मा व इशांत शर्मा (Rohit Sharma and Ishant Sharma) हे आॕस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत खेळायची शक्यता कमीच असल्याचे दिसत आहे. 17 डिसेंबरपासून या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. हे दोन्ही शर्मा बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सध्या फिटनेसच्या तयारीत आहेत. या दोघांनाही अमिरातीतील आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती.
इशांत शर्मा हा आयपीएल सोडून माघारी परतला होता तर रोहित शर्मा हा पायाची नडगी दुखावल्यावरही आयपीएलमध्ये विश्रांतीनंतर शेवटी काही सामने खेळला होता आणि त्याने मुंबई इंडियन्सचे यशस्वी नेतृत्व केले होते. मात्र या दुखापतीमुळे त्याला आॕस्ट्रेलिया दौऱ्यावर मर्यादीत षटकांच्या सामन्यासाठी संघात स्थान मिळाले नव्हते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सुत्रानुसार हे दोघेही आॕस्ट्रेलियातील कसोटी मालिकेसाठी जवळपास बादच झालेले आहेत. हे खेळले तर ते आश्चर्यच म्हणावे लागेल असे भारतीय संघातील एका खेळाडूने म्हटले आहे.
दुखापतीतून सावराण्यास या दोघांना डिसेंबर उजाडेल. त्यानंतरही ते आॕस्ट्रेलियात गेलेच तर 14 दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल. त्यानंतर सराव करता येईल. यामुळे या दोघांचे आॕस्ट्रेलियात खेळणे जवळपास शक्यच नाही.
इशांतने पुन्हा तांदुरुस्त होण्यासाठी पूरेपूर काळजी घेतली आहे पण रोहितचे प्रकरण ज्याप्रकारे हाताळले गेलै आणि त्यानेसुध्दा राष्ट्रीय संघापेक्षा आयपीएलला (IPL) प्राधान्य देत दुखापतीतही खेळायचा धोका पत्करला त्यामुळे बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला