नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? रोहिणी खडसेंच्या प्रश्नावर भाजप आमदारा म्हणाले , “बात दूर तक जायेगी”

Maharashtra Today

जळगाव :  काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला होता . खडसे यांच्या टीकेनंतर माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी त्यांच्यावर पलटवार केला . नंतर सातपुतेंना उत्तर देताना खडसेंच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर (Rohini Khadse Khewalkar) यांनी “तुम्ही नागपुरी बांगड्या भरला होत्या का?” असा सवाल उपस्थित केला . त्यानंतर रोहिणी खडसे आणि सातपुते यांच्यातील शाब्दिक वाद आता टोकाला गेला आहे .

‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत’ अशा शब्दात एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका केली होती. त्यावर बोलताना “नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊबद्दल बोलत आहात.

विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या गोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल” असं ट्वीट राम सातपुतेंनी केले होते.

अहो जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का? अशी टीका रोहिणी खडसेंनी केली.

सातपुते यांनी दुसर्‍यांदा ट्वीट करत “ताई भोसरी जमीन घोटाळ्यामुळे मंत्रीपद गेलं ना हो नाथाभाऊंचे . या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तीच कारवाई झाली ना तेव्हा. आणि यामुळेच आपला 2019 ला मुक्ताईनगरच्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई..? बात निकली ही है तो दूर तक जायेगी ..! असा टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button