रोहिणी खडसेंनीही सोडली भाजपा; राष्ट्रवादीत जाणार

Eknath Khadse NCP

जळगाव : भाजपाचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यानंतर त्यांची कन्या रोहिणी (Rohini Khadse) यांनीही भाजपाचा राजीनामा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली.

रोहिणी खडसे यांनी पत्रपरिषदेत आरोप केला की – मला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतर पराभूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. या प्रकरणाची तक्रार पुराव्यासहित केली होती. मात्र, भाजपाच्या श्रेष्ठींनी याची काहीही दखल घेतली नाही. मी देखील भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे काम करणार आहे.

ज्या व्यक्तीने ४० वर्ष निष्ठेने काम केले त्यांना हा निर्णय घेताना दु:ख होणे स्वाभाविक आहे. नाथाभाऊंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उत्तर महाराष्ट्रात पक्ष उभा केला, असेही रोहिणी खडसे म्हणाल्या.

एकनाथ खडसे यांनी पत्रपरिषदेत भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. त्यांच्यासोबत भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनीही पक्ष सोडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER