हिमायतनगर: पडक्या विहिरीत पडलेला रोही चे वनविभागाने वाचविले प्राण

हिमायतनगर /तालुका प्रतिनिधी: तालुक्यातील सिरंजनी परिसरातील प्रभू गोपाळा संकुरवाड यांच्या शेतातील पडक्या विहिरीत वाट चुकून आलेला रोही पडून जखमी झाला आहे. हि घटना दि. 7 रोजी शुक्रवारी सकाळच्या दरम्यान घडली.

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून जंगलातील पाणी साठे आटले असल्याने वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आज दि. 7 रोजी अगदी पहाटेच्या प्रहारी वाट चुकून आलेला रोही सिरंजनी येथील प्रभू गोपाळा सुंकुरवाड यांच्या पडक्या विहिरीत पडला, सदर घटनेची माहिती स्थानिक शेतक-यांनी वनविभागाला दिल्यावरुन घटना स्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले व जखमी रोहीला वर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते परंतु ; यश येत नसल्याने जेसीबी च्या साह्याने जखमी रोहीला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करून अखेर रोहीला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले असून रोहीला बाहेर काढतांच रोहिने धुम ठोकली. रोहिला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनपरिक्षेञ अधिकारी संध्या ताई डोके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी गोरलावाड, यांच्या सह कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. पाण्याच्या शोधात आलेल्या रोहीचा प्राण सुदैवाने वाचला. परंतु वन्य प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही. याची खबरदारी घेवून वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. असे अशी मागणी वनप्रेमी जनतेतून पूढे आली आहे.