युएस ओपनमध्ये भारताचे आव्हान संपले, रोहन बोपन्ना बाद

Rohan Bopanna out of US open

रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) व डेनिस शापोव्हालोव्ह (Denis Shapovalov) ही जोडी युएस ओपन टेनिस (US open tennis) स्पर्धेच्या पुरुष दुहेरीतून बाद झालली आहे. यासह या स्पर्धेतून भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. सुमीत नागल, दिविज शरण व रोहन बोपन्ना हे तिघे आता बाद झाले आहेत.

बोपन्ना व शापोव्हालोव्ह जोडी उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाली. त्यांना नेदरलँडच्या जीन ज्युलियन रॉजर व रुमानियाच्या होरिया टेकाॕ जोडीने 5-7, 5-7 असे पराभूत केले.

बोपन्ना व.शापोव्हालोव जोडीने आधीच्या फेरीत सहाव्या मानांकित जोडीला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र उपांत्यपूर्व सामन्यात दोन्ही सेटमध्ये बोपन्नाला आपली सर्विस अभेद्य राखता आली नाही. शापोव्हालोव्ह एकेरीच्याही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER