रॉबर्ट वाड्रांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाची धाड, चौकशी सुरू

नवी दिल्ली :- काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे जावई आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा (Robert Vadra) यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आयकर विभागाचं एक पथक धडकलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रा यांना नोटीस पाठवली होती. मात्र, ते आयकर कार्यालयात चौकशीसाठी आले नव्हते. त्यामुळे आयकर विभागाचे अधिकारीच वाड्रा यांच्या घरी दाखल झाले असून त्यांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यांचं स्टेटमेंट नोंदवलं जात असून गेल्या अर्ध्या तासांपासून ही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

साऊथ ईस्ट दिल्लीतील सुखदेव विहार येथील वाड्रा यांच्या कार्यालयात त्यांचा जवाब नोंदवला जात आहे. बिकानेर आणि फरिदाबाद येथील जमिनीच्या घोटाळ्याप्रकरणी आयकर विभागाने त्यांची चौकशी सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोरोना महामारीमुळे वाड्रा हे आयकर विभागाच्या कार्यालयात चौकशीला सामोरे गेले नव्हते. त्यामुळे त्यांची आज चौकशी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER