
झुरिक : जागतिक फूटबॉल नियंत्रण संस्था ‘फिफा’च्या (Fifa) 2020 च्या ‘दि बेस्ट’ (The Best) पुरस्कारांत अपेक्षेप्रमाणे पोलंड व बायर्न म्युनिकचा फॉरवर्ड रॉबर्ट लेवांदोस्की (Robert Lewandowski) हा सर्वोत्तम पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांमध्ये यंदा ‘दि बेस्ट’ असण्याचा मान इंग्लंड व लियॉनची खेळाडू ल्युसी ब्राँझ (Lucy Bronze) हिला मिळाला आहे. फिफाच्या मुख्यालयात गुरुवारी रात्री हा पुरस्कार सोहळा व्हर्च्युअल (आॕनलाईन) पध्दतीने झाला. या सोहळ्यात अलीकडेच निधन झालेल्या दिएगो मॕराडोना व पावलो रोसी या दोन दिग्गजांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यंदाच्या पुरस्कारांवर बायर्न म्युनिकची छाप राहिली. सर्वोत्तम खेळाडू लेवांदोस्कीशिवाय त्यांचा मॕन्युएल न्युएर हा सर्वोत्तम गोलरक्षक ठरला. याशिवाय ‘फिफा’ च्या वर्ल्ड इलेव्हनमध्येही बायर्नच्या बऱ्याच खेळाडूंना स्थान मिळाले.
लिव्हरपूलचे युर्गेन क्लोप (Jürgen Klopp) हे सलग दुसऱ्या वर्षी ‘दि बेस्ट’ प्रशिक्षक ठरले तर महिलांमध्ये नेदरलँडसला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सारीना विगमन बेस्ट कोच ठरल्या. क्लोप यांना बायर्नचे प्रशिक्षक हान्सी फ्लिक यांच्याकडून स्पर्धा होती आणि क्लोप यांची सलग दुसऱ्या वर्षी निवड करताना फ्लिक यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा आहे. त्याच्याप्रमाणे महिलांच्या बेस्ट इलेव्हनमध्ये मेगन रापिनोचा समावेश आणि सारा बौहादीसारख्या बेस्ट गोलकीपरला वगळल्याची चर्चा आहे. मँचेस्टर युनायटेडच्या मार्कस रॕशफोर्ड व आणखी काही फूटबॉलपटूनी कोविड -19 च्या काळात केलेल्या समाजसेवेचे व मदतकार्याचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार विजेते असे –
1) सर्वोत्तम पुरुष खेळाडू- रॉबर्ट लेवांदोस्की (पोलंड व बायर्न म्युनिक)
2) सर्वोत्तम महिला खेळाडू- ल्युसी ब्राँझ (इंग्लंड व लियाॕन)
3) सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक- युर्गेन क्लाॕप (लिव्हरपूल)
4) सर्वोत्तम महिला प्रशिक्षक- सारिना विगमन (नेदरलँडस्)
5) सर्वोत्तम पुरुष गोलरक्षक – मॕन्युएल न्युएर (जर्मनी व बायर्न म्युनिक)
6) सर्वोत्तम महिला गोलरक्षक – सारा बौहादी (फ्रान्स व लियाॕन)
7) फिफा पुस्कास सन्मान – सोन ह्युंग मीन (टाॕटेनहॕम वि. बर्नली)
8) फिफा खेळाडूवृत्ती पुरस्कार- मेटिया इग्निस (इटली) या 17 वर्षिय खेळाडूने सामन्यादरम्यान एका बेशूध्द झालेल्या खेळाडूला वेळीच वैद्यकीय मदत केली होती.
9) फिफा सर्वोत्तम चाहता पुरस्कार (फॕन अॕवार्ड) – मेरिवाल्डो फ्रान्सिस्को दा सिल्वा ( ब्राझिलियन क्लब स्पोर्ट क्लब दो रेसिफचा प्रशंसक)
दा सिल्वा ने या क्लबचा घरच्या मैदानावरील प्रत्येक सामन्याला हजेरी लावली आहे आणि त्यासाठी प्रत्येकवेळी तो 60 किलोमीटरचे अंतर चालत स्टेडियममध्ये येतो.
लेवांदोस्कीने नेहमीचे विजेते असणारे लियोनेल मेस्सी व ख्रिस्तीयानो रोनाल्डो यांच्यावर बाजी मारली. तो 2018 नंतर मेस्सी व रोनाल्डोशिवाय ‘दि बेस्ट’ ठरलेला पहिलाच वेगळा खेळाडू ठरला. 2018 मध्ये ल्युका मोड्रीचने हा मान मिळवला होता.
ल्युसी ब्राँझ ही दि बेस्ट ठरलेली पहिली डिफेंडर ठरली. ती यंदाच्या चॕम्पियन्स लिग विजेत्या लियाॕन्स संघात होती. तिने डेन्मार्कची पेर्निल हार्डर व फ्रान्सचीच वेंडी रेनार्ड हिच्यावर बाजी मारली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला