कोल्हापुरात युनियन बँकेवर दरोडा; १८ कोटी रुपये लुटले

कोल्हापूर : कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील धामोड येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरट्यांनी बुधवारी पहाटे दरोडा टाकला. या दरोड्यात सुमारे १८ कोटी रुपयांची लूट केल्याचे प्राथमिक माहिती पुढे आली आहे. घडल्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

आज कोल्हापुरात कडकडीत बंद

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. धामोड येथील मध्यवर्ती बाजारपेठेतील युनियन बँकेवर बुधवारी पहाटे दरोडा टाकून दरोडेखोरांनी १७ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने आणि २५ लाखांची रोकड असा १८ कोटींचा ऐवज लुटला. आज बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मध्यवर्ती बाजारपेठेतील युनियन बँक लुटल्याने कोल्हापूर जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी पोलिसांची पथके धामोडकडे रवाना झाली आहेत.