जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील चोरीचा छडा लागला

robbery cases at Jaisingpur police station

कोल्हापूर : जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झालेल्या बहुचर्चित चोरीप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण व जयसिंगपूर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे बेड्या ठोकल्या रघुनाथ बाळासाहेब कदम, विकास विलास पाटील,( राहणार जय विजय चौक राजीव गांधी नगर जयसिंगपूर) अशी त्यांची नावे आहेत. चोरट्यांनी पोलीस ठाण्यातील चोरीची कबुली दिली आहे .

चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल अर्जुनवाढ तालुका शिरोळ येथील नदीच्या पात्रात फेकून दिल्याची कबुलीही संशयितांनी दिले आहे. आज सकाळपासून नदीच्या पात्रात शोध मोहीम सुरू आहे. जयसिंगपूर येथील पोलीस पोलीस पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात झालेल्या पोलीस ठाण्यात झालेल्या चोरीप्रकरणी राज्यात सर्वत्र चर्चा सुरु झाली होती. पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर किशोर काळे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी या चोरीचा छडा लावला.