फायनान्स कंपनीच्या वसूली प्रतिनिधीला लुटले

जळगाव रोडवरील घटना

मारहाण

औरंगाबाद : फायनान्स कंपनीच्या वसूली प्रतिनिधीला आमच्या नातेवाइकाची दुचाकी फायनान्स कार्यालयात का जमा केली असे म्हणत चौघांनी शिवीगाळ व मारहाण करुन १० हजाराला लुटले. ही घटना २७ जून रोजी रात्री ८.३० च्या सुमारास जळगाव रोडवरील कलावती मंगल कार्यालयाजवळ घडली.

मित्राचा वाढदिवस असल्याने अनिल प्रेमलाल खरे (३२, रा. गल्ली क्र. ३, रमानगर, जालना रोड) हे हर्सुल टी पाईंट येथून मित्र सुरेश फुले याला वाढदिवसाचा केक घेऊन जात दुचाकीने जात होते. त्यावेळी कलावती मंगल कार्यालयाजवळ खरे यांना गाठून संदीप चांदणे, सचिन तुपे, रवि जाधव व पडूळ यांनी आमच्या नातेवाइकाची दुचाकी तुझ्या फायनान्स कार्यालयात का जमा केली.

तू काय कुठला दादा लागून गेला आहे का ? असे म्हणत शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी चांदणेने कपाळावर जबरदस्त वार करुन पँटच्या पाठीमागील खिशातील १० हजारांची रोकड हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर खरे यांनी सिडको पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER