रस्ते, सिंचन, रोजगार, त्रिसुत्रीने विकास साधणार – शेकापचे उमेदवार श्यामसुंदर शिंदे 

Shyamsundar Shinde

माळाकोळी/वार्ताहर :- सनदी अधिकारी म्हणून कर्तव्य बजावल्यानंतर जनसेवेच्या उद्देशानेच राजकारणात प्रवेश करत असल्याचे तसेच लोहा कंधार भागात रस्ते ,सिंचन, रोजगार व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यावर आपला भर राहणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांनी माळाकोळी येथे आयोजित जाहीर सभेत केले.

माळाकोळी व परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र बारा ज्योतिर्लिंग मंदिरात नारळ फोडून त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय कुरडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सभापती प्रविण पाटील चिखलीकर, आशाताई शिंदे, विक्रांत शिंदे, तालुका अध्यक्ष शरद पाटील, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, बाळू पाटील कर्‍हाळे, सभापती बालाजी पाटील मारतळेकर, उपसभापती बालाजी पाटील कदम, गणेशराव सावळे माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब शिंदे, सुभाष गायकवाड, जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील, भगवानराव राठोड, माजी उपसभापती रोहित पाटील परमेश्वर मुरकुटे सुभाष भालेराव, सखाराम तिडके, चंद्रमुनी मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : किनाळा : सोयाबीन पिकाचे सर्वे करून शेतकर्याना नुकसान भरपाई दयावी-मा.जिप सदस्य टाकळीकर

सनदी अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करण्याचा मला अनुभव आहे, पश्चिम महाराष्ट्र व ईतर क्षेत्रातील सिंचन व्यवस्था, रस्ते, व शिक्षण, या क्षेत्रातील झालेली भरीव प्रगती पाहून लोहा कंधार मतदार संघात असा विकास का होऊ शकत नाही असा प्रश्न मला सतत भेडसावत होता, सेवानिवृत्तीनंतर कंधार लोहा क्षेत्रातील सिंचन, रस्ते, शिक्षण, पाणीपुरवठा, बेरोजगारी या प्रमुख मुद्द्यांवर भर देऊन या भागाचा विकास साधण्यासाठी मी कटीबद्ध असणार आहे.

यासाठी शेकाप च्या माध्यमातुन मी विधानसभा निवडणुक लढवत आहे, मला या भागाच्या विकासासाठी संधी द्यावी.

यावेळी बोलताना प्रविण पाटील चिखलीकर म्हणाले मागील काळात आपण चिखलीकर कुटुंबावर विश्वास ठेऊन जनसेवेची संधी दिलीत, आम्हीही येथील सामान्य जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही या भागाचा विकास केला, आताही उच्चशिक्षीत असलेले शामसुंदर शिंदे यांना संधी द्यावी व या भागाचा विकास साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुभाष पाटील भालेराव यांनी केले तसेच यावेळी चंद्रसेन पाटील, आशाताई शिंदे, विक्रांत शिंदे, माधवराव तेलंग, भगवानराव राठोड, चंद्रमुनी मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले.

या वेळी नगरसेवक दताञय वाले, भास्कर पा. पवार, संतोषनाना तिडके ,गणपत अण्णा तिडके , मधुकर बाबर,माधवराव बाबर ,रामराव शिंदे ,बालाजी परदेशी ,डींगाबर पा.भालेराव ,,भय्या साहेब जोंधळे ,संजयमामा चाटे , व मतदार ऊपस्थित होते.