रेल्वेचे रुग्णालय महिनाभरापासून धूळखात पडलेले; विभागाचे मुंढेंना पत्र

Tukaram Mundhe - Railway - COVID19

नागपूर : कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी राज्य शासनाने उपाययोजना केल्या असूनही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटल्स कमी पडत आहेत. करिता विभागीय रेल्वे प्रशासनाला याकडे लक्ष घालावे लागत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात वैद्यकीय पुरवठा व संबंधित उपकरणे खरेदी करण्यासाठी आतापर्यंत सुमारे दोन कोटी रुपये रेल्वे विभागाने खर्च केले आहेत. याउलट रेल्वेचे दोन कोच विलगीकरण कक्ष म्हणून सज्ज aकेले आहेत.

नागपूरसाठी 38 तर बल्लारशा येथे 20 डबे रुग्णांसाठी विलगिकरण कक्षासाठी तयार आहेत. कोरोनाबाधित रेल्वेतील विलगीकरण रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी चार डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. पॅरामेडिक व सेनेटरी स्टाफला आवश्यकतेनुसार बोलावण्यात येणार आहे. कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात भरती करून घेता यावे यासाठी रेल्वेचे डबे विलगिकरण कक्षासाठी वापरण्याचे ठरले होते.

दुकाने उघडण्याबाबतचा निर्णय सुधारण्यासाठी हायकोर्टाने नागपूर मनपाला दिली मुदत

परंतू रेल्वेने ही सुविधा सज्ज ठेवली असताना आता एक महिना पूर्ण होऊनही जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने आजपर्यंत एकाही रुग्णाला रेल्वेकडे रेफर केले नाही. त्यामुळे नागपूर मध्य रेल्वेने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून ही माहिती दिली. व रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगिकरणासाठी जी व्यवस्था केली आहे. त्याचा शुन्य उपयोग होत असून यामुळे रेल्वेच्या खर्चाचा उपव्यय होण्याच्या भीतीने नागपूर मध्ये रेल्वेने हे पत्र आयुक्तांना पाठवले आहे.

रेल्वे प्रशासनाने यासाठी चार व्हेंटिलेटर खरेदी केले असून संपूर्ण रेल्वेप्रभागात ते तत्परतेने ठेवण्यात आले आहेत. तसेच, रेल्वेतील अलगीकरणात असेलेले कोरोना रुग्णांना हातळण्यासाठी, रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व पॅरामेडिक कर्मचार्‍यांनी विशेष प्रशिक्षणदेखील घेतले. योग्य ती घ्यावयाची खबरदारी आणि त्यांनी एसओपीदेखील तयार केला. असे या पत्रातून सांगण्यात आले आहे.

शासनाने सांगितल्याप्रमाणे रेल्वे विभागाने डब्यांमध्ये विलगिकरण कक्षाची व कोरोना रुग्णांसाठी आवश्यक ती सुविधा तयार ठेवली आहे. मागिल एक महिन्यापासून नागपूर येथील रेल्वेचे डबे विलगिकरण कक्ष म्हणून रिकामे पडले आहेत. दक्षिणपूर्व मध्य रेल्वे (एसईसीआर) येथे, विलगीकरणाच्या रूग्णांना हाताळण्यासाठी जवळपास 10 डबे तयार केले गेले होते पण ते आता धूळखात पडले आहे. अजनी कॉलनी येथे आरपीएफ बॅरेक, अजनी रेल्वे संस्था, अभियांत्रिकीचे जिल्हा प्रशिक्षण केंद्र (डीटीसी) मेकॅनिकल शाखा अशा विविध ठिकाणी सुमारे 150 बेड ठेवण्यात आले आहेत.

रेल्वेच्या अधिक-यांनी विभागीय प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता प्रोटोकॉलनुसार जेव्हा स्थानिक सरकारी रुग्णालयांची क्षमता संपेल तेव्हाच फक्त रुग्णांना रेल्वेकडे पाठवले जाते. परंतू अशी परिस्थिती उद्भवू नये आणि समाजात यापुढे कोरोनव्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखू शकू असे ते म्हणाले. दरम्यान, कोरोनाव्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढण्याच्या अपेक्षेने राज्य सरकारने मेयो हॉस्पिटलमध्ये 1400 बेडच्या अतिरिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (जीएमसीएच) नवीन 600 खाटांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याशिवाय मनपाने सुमारे पाच हजार रूग्णांची क्षमता असणारी रुग्णालयही तयार केली आहेत. त्याचप्रमाणे, प्रशासनाने संदर्भित केल्यास कोरोना रूग्णांना सांभाळण्यास तयार राहावे म्हणून महापालिकेने शहरातील डझनभर खासगी रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत.

रेल्वे प्रशासनानेदेखील शासनाच्या म्हणण्यानुसारच रेल्वेचे डबे कोरोना रुग्णांसाठी सज्ज ठेवलेत मात्र, महिना उलटूनही नागपूर स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत रेल्वे सुविधांचा उपयोग घेतला नाही. रेल्वेने कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी पूरेशी उत्तम व्वस्था केली आहे. तेथे पुरेशी वैद्यकीय सेवा आणि बेड आधीच उपलब्ध आहेत. ‘आयुष्मान भारत योजनेच्या रूग्णांसाठी’ रेली हॉस्पिटलचा वापर करा असे ‘रेल्वे कामगार सेनेने (आरकेएस) पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात सूचना केली आहे . रेल्वे रूग्णालयात उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे कोरोनाव्हायरस व्यतिरिक्त इतर रूग्णांसाठीही या सुविधेचा उपयोग करता येईल. मेयो हॉस्पिटल आणि जीएमसीएच कोरोना रुग्णांनी भरलेले आहेत तेव्हा आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट असलेल्या इतर सामान्य रूग्णांना विभागीय रेल्वे रूग्णालयात त्वरित पाठवले जाऊ शकते जेणेकरून सर्व रुग्णांना योग्य ती वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल. असे रेल्वे प्रशासनाने पत्रातून सुचवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला