आरएलडीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे कोरोनाने निधन

Maharashtra Today

मुजफ्फरनगर :- राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह (Chaudhary Ajit Singh) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांना २२ एप्रिलला कोरोना (Corona) झाला होता. त्यांच्यावर गुरुग्रामच्या एका खासगी रुग्णालयात सुरू होते. मंगळवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या फुफ्फुसामध्ये संक्रमण वाढल्यामुळे त्यांची तब्येत नाजूक झाली होती.

माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह य़ांचे अजित सिंह हे पूत्र होत. अजित सिंह बागपतहून सात वेळा खासदार निवडून आले होते. ते २००१ ते २००३ वाजपेयी सरकारमध्ये कृषी मंत्री होते. युपीए सरकारच्या काळात ते नागरी उड्डाण मंत्री होते. त्यांनी २००९ मध्ये मुजफ्फरनगर येथून ते पराभूत झाले होते. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये अजित सिंह हे जाटांचे बडे नेते म्हणून ओळखले जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button