राजीव कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या या ९४ वर्षीय वृद्धाचे लोक करीत आहेत कौतुक; काय आहे कारण?

rk-studio-manager-vishwa-mehra-pays-tribute-to-rajiv-kapoor

राज कपूर यांच्यापासून आरके स्टुडिओचे व्यवस्थापक (Manager) म्हणून काम करणारे ९४ वर्षीय वृद्ध विश्व मेहरा (Vishwa Mehra) हे राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवारी हजर झाले. हातात काठी, दुबळी कंबर, ओलसर डोळे आणि हलकी पावले टाकत विश्व मेहरा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कपूर परिवाराच्या तीन पिढ्यांचे साक्षीदार असलेले विश्व मेहरा यांच्यासाठी राजीव कपूर यांचे निधनदेखील धक्कादायक आहे. कपूर कुटुंबातील सर्व चढउतार पाहणारे विश्व मेहरा आरके स्टुडिओचे व्यवस्थापक म्हणून सुरुवातीपासूनच होते.

आता गोदरेज ग्रुपने त्याला विकत घेतले आहे. लोक विश्‍व मेहरा यांच्या फोटोवर हार्ट इमोजी पोस्ट करीत आहेत आणि कपूर परिवारावरील त्यांच्या निष्ठेचे कौतुक करीत आहेत. राज कपूर यांची फिल्म प्रोडक्शन कंपनी आरके फिल्म्सचे ऑफिस म्हणून आरके स्टुडिओचा वापर करण्यात येत होता. या स्टुडिओच्या स्थापनेपासून विश्व मेहरा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. २०१७ मध्ये या स्टुडिओमध्ये प्रचंड आग लागली आणि कोट्यवधींचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात उपकरणे, कपडे आणि इतर अनेक वस्तू जळल्या. नंतर त्याचा वापर थांबला. यानंतर, मे २०१९ मध्ये गोदरेज ग्रुपने आरके स्टुडिओची २.२ एकर जमीन खरेदी करण्याची घोषणा केली होती.

आता गोदरेज ग्रुपजवळ आहे आरके स्टुडिओ चेंबूर येथील हा स्टुडिओ कपूर कुटुंबाची सात दशकांपासून ओळख होती. आता गोदरेज ग्रुपने हा मिक्सड युज्ड प्रोजेक्ट म्हणून उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूडचा शोमॅन म्हणून ओळखल्या जाणार्‍या राज कपूर यांना ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर अशी तीन मुले आहेत. गेल्या वर्षी, ऋषी कपूर यांचा मृत्यू कोरोना लॉकडाऊन दरम्यान झाला. आता राजीव कपूर यांच्या मृत्यूने कपूर कुटुंबातील आणखी एक स्टार काळाआड गेला आहे. रणधीर कपूर आपल्यामध्ये आहेत.

चार वर्षांत कपूर कुटुंबाने गमावले पाच सदस्य कपूर कुटुंबीयांनी राज कपूरची पत्नी कृष्णा राज कपूर यांच्यासह मागील चार वर्षांत पाच सदस्य गमावले आहेत. मंगळवारी राजीव कपूर यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूड इंडस्ट्री शोकात बुडाली. नवीन वर्षात बॉलिवूड इंडस्ट्रीला आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा धक्का आहे. राज कपूर हे राजीव कपूर यांचे मामा होत.

बर्‍याच चित्रपटांत काम केले विश्व मेहरा यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांनी ‘आवारा’, ‘जब जब फूल खिले’ आणि ‘प्रेमग्रंथ’ यासारख्या चित्रपटांमध्येदेखील अभिनय केला आहे. ते राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर यांचे मामा आहेत. यामुळे संपूर्ण उद्योग त्यांना मामा म्हणतात विश्व मेहराऐवजी ते मामा म्हणून लोकप्रिय आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER