रियाझ काझी हे वाझेंचे सहकारी; NIA कडून वाझेंना ११ दिवसांची कोठडी

NIA - Sachin Vaze

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) अँटेलिया बंगल्यासमोर स्कॉर्पिओमध्ये स्फोटके आढळली. या प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांना शनिवारी रात्री ‘एनआयए’कडून (NIA) अटक करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. एपीआय रियाझ काझी (Riyaz Kazi) यांची NIAकडून तीन तासांपासून चौकशी सुरू आहे. ते सचिन वाझेंचे सहकारी आहेत. सचिन वाझे (Sachin Vaze) यांना ११ दिवसांची NIA कोर्टाने कोठडी सुनावली आहे.

२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडली. या प्रकरणी एनआयएने शनिवारी रात्री ११.५० वाजता एपीआय सचिन वाझेंना अटक केली. तब्बल १३ तास NIA कडून सचिन वझे यांची चौकशी झाली. सूत्राच्या माहितीनुसार, एपीआय रियाझ काझी हे सचिन वझे यांचे सहकारी आहेत. एनआयएकडून गेल्या तीन तासांपासून रियाझ काझी यांची चौकशी सुरू आहे. काझी यांची सीआययूमध्ये नियुक्ती आहे. या सर्व प्रकरणात रियाझ काझी हे सक्रिय राहिलेले आहेत. सचिन वाझे यांचे ते जवळचे मित्र म्हणून ओळखले जाते, असे सूत्रांकडून सांगिलते जात आहे. काझी यांना आज सकाळी ११ वाजता NIA ने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात सुटीकालीन खंडपीठासमोर दाखल करण्यात आले. NIAने १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, सचिन वाझे यांना ११ दिवसांची NIA कोर्टाने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे उद्या पुन्हा वझे यांना NIA कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात येईल. आज सुटीकालीन कोर्टात ४० मिनिटे युक्तिवाद करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER