रियाला अटक : सायंकाळी न्यायालयासमोर करणार सादर

Rhea Chakraborty

मुंबई : एनसीबीने  (The Narcotics Control Bureau )  अभिनेता सुशांतची मैत्रीण रियाला आज (८ ऑगस्ट)  दुपारी अटक केली. आज सतत तिसऱ्या दिवशी चौकशी केल्यानंतर एनसीबीने तिला अटक केली. कोरोना चाचणीसह तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. नंतर भाऊ शोविकसह इतर आरोपी, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि एक कर्मचारी दीपेश सावंत याच्यासोबत आज सायंकाळी साडेसात वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने तिला न्यायालयासमोर सादर करण्यात येईल.

अटक केल्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी रियाला सायनच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. १४ जून रोजी सुशांत घरी गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला होता. आता तीन महिन्यांनंतर त्याची मैत्रीण रियाला एनसीबीने अमलीपदार्थ कायद्यांतर्गत विविध कलमांत अटक केली आहे.

प्रेमाची शिक्षा

रियाचे वकील सतीश मानशिंदे रियाच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले – अमलीपदार्थांच्या व्यसनाधीन असलेल्या आजारी, पाच मानसिक रोगतज्ज्ञांकडून उपचार घेत असलेल्या आणि अवैध सल्ल्याने औषधी घेण्याच्या परिणामी अखेर आत्महत्या केलेल्या माणसावर प्रेम करण्याची शिक्षा म्हणून तीन केंद्रीय संस्था तिचा छळ करत आहेत.

डीजीपी गुप्तेश्वर पांडे

रियाचे अमलीपदार्थांचा व्यापार करणाऱ्यांशी असलेले संबंध आता उघड झाले आहेत. त्यामुळे तिला अटक झाली. एनसीबीला तिच्याविरुद्ध पुरावा सापडला असावा, असे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले.

देव आमच्यासोबत आहे – श्वेता सिंग कीर्ती

रियाच्या अटकेची बातमी येताच सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने ट्विट केले – देव आमच्यासोबत आहे.

गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना बरखास्त करा – किरीट सोमय्या

रियाच्या अटकेनंतर ठाकरे कुटुंबाला डिवचताना भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले – रियाला अटक. ठाकरे सरकार / परिवार काळजीत असेल; अटकेबाबत आता नंबर कोणाचा ? पहिल्या दिवसापासून सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात चौकशी चुकीच्या दिशेने भरकटवण्यासाठी  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बरखास्त केले पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER