रिया कपूरनेही सोशल मीडियावर शेअर केले बिकीनीतील फोटो

केवळ बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारच नव्हे तर त्यांच्या नात्यातील अन्य मुलींनाही बिकिनीत फोटो काढून सोशल मीडियावर (Social Media) शेअर करण्याची आवड निर्माण झालेली आहे. प्रख्यात अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) बहिणीने कृष्णा श्रॉफने (Krishna Shroff) यापूर्वी अनेक वेळा बिकीनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते आणि आताही करीत आहे. तिच्या या अशा फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. प्रख्यात अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नातीने नव्यानेही (Navya) काही दिवसांपूर्वी बिकीनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. आता प्रख्यात अभिनेता अनिल कपूरची (Anil Kapoor) लहान मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरची (Sonam Kapoor) बहिण रिया कपूरनेही (Rhea Kapoor) बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले आहेत.

खरे तर रिया नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहात आली आहे. बहिण सोनमसोबत रियाने कपड्यांचा बिझनेस तर सुरु केलाच होता. तिने सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल टाकत सिनेमांची निर्मिती केली आहे. पण ती प्रसार माध्यमांसमोर फार येत नाही किंवा सोशल मीडियावरही सक्रिय नसते. रियाने ‘वेकअप सिद’ सिनेमाच्या वेळी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करून पडद्यामागे काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ११ वर्षांपूर्वी म्हणजे 2010 मध्ये बहिण सोनम कपूरसोबत सिनेनिर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकत ‘आयेशा’ सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमात सोनम कपूर आणि अभय देओल यांच्या भूमिका होत्या. यानंतर रियाने ‘खूबसूरत’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमांचीही निर्मिती केली. लाईमलाईटपासून दूर राहाणाऱ्या रियालाही सोशल मीडियाची चटक लागल्याचे दिसत आहे. रिया कपूरने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत रियाने लिहिले आहे, ‘मला वाटत होते की मी जाडी झाली आहे. आपण स्वतःसोबत कधी जिंकू शकत नाही का? पण आपण प्रयत्न करू शकतो. टीना फे म्हणते की, जर तुम्ही काही ठेऊ शकत नसाल तर सौंदर्याचा सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात ठेवा की, कोणाला फरक पडणार आहे?’ यासोबत रियाने दोन हसणाऱ्या इमोजीही टाकल्या आहेत. रियाच्या या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

रियाही आता सोशल मीडियावर अशा या वेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहाण्याचा विचार करीत असल्याचे यातून दिसत आहे. मात्र अशी प्रसिद्धी जास्त काळ राहात नाही हे तिला कोणीतरी समजावून सांगितले पाहिजे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER