रिया १३ जूनला सुशांतला भेटली होती; ही आहे ‘गेमचेंजर’ बातमी- श्वेता सिंह

Shweta Singh

मुंबई :- सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या रात्री, म्हणजे १३ जून रोजी रिया सुशांतला भेटली होती. याचा साक्षीदार आहे ही ‘गेमचेंजर’ बातम, असा दावा सुशांतची बहीण श्वेता कीर्ती सिंह हिने केला आहे. यामुळे या खटल्याला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. श्वेता कीर्ती सिंहने ट्वीट केले आहे – ही गेमचेंजर बातमी आहे. रिया माझ्या भावाला १३ जूनच्या रात्री भेटली होती, हे सांगणारा एक साक्षीदार आहे.

१३ जूनच्या रात्री नेमके काय झाले होते, ज्यानंतर दुसऱ्या दिवशी १४ जूनला सकाळी माझा भाऊ मृतावस्थेत सापडला? रियाने म्हटले आहे – मी ८ जूनला सुशांतचे घर सोडले. तेव्हा त्याची बहीण मीतू त्याच्यासोबत राहायला आली होती. त्यानंतर मी सुशांतला भेटलीच नाही. आता श्वेता सिंह कीर्तीच्या या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. हा साक्षीदार सीबीआयच्या तपासात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. या प्रकरणाचा ‘ड्रग्ज अँगल’ने तपास करणाऱ्या एनसीबीने रियाच्या घरातून दीड किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. यात चरस आणि गांजा आहे.

या प्रकरणी रिया आणि तिचा भाऊ शोविकला १० ते २० वर्षे तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने दिल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. रिया आणि शोविकच्या घरातून किती ड्रग्ज सापडले, हे त्यांच्या वकिलांनाही माहीत नाही, असेदेखील या अधिकाऱ्याने सांगितले. ड्रग्ज घेणे आणि त्याचा व्यवहार करणे या आरोपाच्या चौकशीसाठी रियाला ९ सप्टेंबरला अटक करण्यात आली. तिला ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आली आहे. रिया आणि शोविकच्या जामीन याचिकेवर २९ सप्टेंबरला सुनावणी झाली. कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. हा निर्णय येण्याआधीच रियाच्या घरात ड्रग्ज सापडले आहे. एनसीबीला मोठा पुरावा सापडला आहे. त्यामुळे रियाच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER