रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

Riya Chakraborty

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्हत्या प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे (Rhea Chakraborty). चार दिवस चौकशी केल्यानंतर रियाला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. सायंकाळी साडे चार वाजता तिची आरोग्य तपासणी आणि कोव्हिड चाचणी केली जाणार आहे .

आज सकाळी साडे नऊ वाजल्यापासून एनसीबी (NCB) रियाची चौकशी करत होती. काल आणि परवा तब्बल 10 तास रियाची चौकशी झाली. आज सकाळपासूनच रियाच्या अटकेसाठी एनसीबीच्या हालचाली सुरू होत्या.

सध्या एनसीबी कार्यालयाच्या बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कुठल्याही आरोपीला अटक केल्यानंतर त्याची कोव्हिड चाचणी केली जाते. अटकेपूर्वीची ही सर्व प्रक्रिया असते. त्यासाठी रियाला सायन रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

रिया अटकेसाठी तयार असल्याची माहिती तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रविवारीच दिली होती. “जर एखाद्यावर प्रेम करणे हा गुन्हा असेल, तर तिला तिच्या प्रेमाचे परिणाम भोगावे लागतील. निर्दोष असल्याने, तिने बिहार पोलिसांसह सीबीआय, ईडी आणि एनसीबीने दाखल केलेल्या केसमध्ये अटकपूर्व जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतली नाही” असे ते म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER