
कोल्हापूर : कोरोनाच्या संकटकाळात शेतकरी, उद्योजक, केसरी रेशनकार्डधारक तसेच हातावर पोट असणाऱ्या, रोजंदारी करणाऱ्या लोकांना दिलासा द्यावा,अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
आमदार ऋतुराज पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील लोकांकडून आलेल्या सूचना आणि मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क केला.तसेच महत्वाच्या १५ मागण्यांचा अहवाल ई-मेल द्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे.
यामधील महत्वाच्या मागण्या खालीलप्रमाणे
1. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचा विशेषतः युरियाचा तुटवडा जाणवत असून ही खते तात्काळ उपलब्ध करून द्यावी.
2. शेतकऱ्यांना दिवसा शेती पंपासाठी वीज पुरवठा करावा
3. लॉकडाउनमुळे कमर्शियल वीज वापर हा गेली महिनाभर बंद आहे. या ग्राहकांचे वीज बिल काही हजारात येते. काहीही वीज वापर नाही, त्यामुळे हे वीज बिल घेऊ नये अशी मागणी या ग्राहकांची आहे.
4. उद्योग सुरू करण्यासाठीचा फॉर्म क्लिस्ट आहे. तसेच काम सुरू झाल्यावर एखादा कामगार कोरोनाग्रस्त सापडला तर कंपनी मालकावर गुन्हा नोंद होणार आणि कंपनी सील होणार ही अट काढून टाकावी , अशी उद्योजकांची मागणी आहे.