
कोल्हापूर : काँग्रेसचे कोल्हापूर शहर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. गेल्या वर्षी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवत ऋतुराज पाटील यांनी भाजपचे अमल महाडिक यांचा 40 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. आमदार झाल्यापासून ऋतुराज पाटील सतत वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. कोल्हापुरात त्यांचा युवक वर्गात मोठा संपर्क आहे.
निवडणुकीत पाच हजार झाडे लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते, ते उद्या रविवारी पूर्ण करत आहेत. कोल्हापुरातील एक हजार तरुणांना नोकर्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून त्याची पूर्तता करत आहेत. डॉ. वाय. पाटील यांचे नातू आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे ते चिरंजीव असून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे आहेत. ऋतुराज पाटील यांना समृद्ध राजकीय आणि सामाजिक वारसा लाभला आहे.आ. ऋतुराज पाटील यांच्या निवडीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. युवा वर्गात ऋतुराज यांची मोठी क्रेझ आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला