श्रीमंताच्या घरी यशोमानचा रियाज

Yashoman Apte

लॉकडाउन मधलं एकदम संथ झालेले आयुष्य आता चांगलेच रूळावर आले आहे. याला कलाकार देखील अपवाद नाहीत. शूटिंग सुरू झाले असल्यामुळे नव्या मालिका देखील आलेले आहेत प्रेक्षकांच्या भेटीला आल्याआहेत. एकाच वेळी मालिका करणं ,नाटकाचे प्रयोग करणं सिनेमाच्या शुटिंगसाठी तारखा देणं हे काही कलाकारांसाठी नवीन नाही. अशी कसरत त्यांना अनेकदा करावी लागते. पण जेव्हा अभिनय आणि गाणं अशा दोन गोष्टी एकत्र कराव्या लागतात तेव्हा अभिनयातून वेळ काढत रियाज या दोन्ही गोष्टी सांभाळणे खरंच जिकिरीचं होऊन जातं. सध्या अभिनेता यशोमान आपटे हा अशीच अभिनय आणि गाण्यामधला सूर सांभाळत आहे.

श्रीमंता घरची सून या मालिकेच्या सेटवर जेव्हा शॉट मधून रिकामा वेळ मिळतो तेव्हा तो तडक एखादा कोपरा शोधतो आणि त्याठिकाणी सिंगिंग स्टार या शो साठी गाण्याची तयारी करत बसतो.अर्थात हा अनुभव तो खूप छान एन्जॉय करत असल्याचं आवर्जून सांगतो.

फुलपाखरू या मालिकेतून हिट ठरलेल्या यशोमान आपटे याने त्याचा

फॅन फॉलोईंग चांगलाच वाढवला आहे. तीन ते साडेतीन वर्षांपासून लोकप्रिय असलेली फुलपाखरू ही मालिका लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी संपली. या मालिकेतही यशोमानने अनेक गाणी स्वतःच्या आवाजात गायली होती. खरेतर यशोमान हा गाणं शिकलेला नाही, मात्र त्याला गाण्याची आवड आहे, आणि त्याच्या गळ्यात असलेला सूर र आपण फुलपाखरू या मालिकेतील वेगवेगळ्या गाण्यांच्या निमित्ताने ऐकला आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयाचे चाहते जितके आहेत तितके त्याच्या गाण्यावर फिदा असलेले चाहते देखील आहेत. आणि त्याच्या चाहत्यांना हीच ट्रीट मिळाली की यशोमान त्यांना प्रत्यक्ष गाणं म्हणताना पाहता येणार. दोन महिन्यापूर्वी सिन्गींग स्टार या नावाने सुरू झालेल्या शोमध्ये सेलिब्रिटी कलाकारच गाणं सादर करणार असल्याने या शोबाबत प्रचंड उत्सुकता वाढली. प्रोमो पासूनच यशोमान गाणं गाताना दिसत होता. खरेतर सुरुवातीला केवळ सिन्गींग स्टार हाच शो त्याच्या हातात होता. तर आनंदी हे जग सारे या मालिकेत त्याची एंट्री झाली होती त्यामुळे सुरुवातीच्या काळात सिंगिन्ग स्टार या शोसाठी त्याला खूप वेळ देता येत होता. गाण्याच्या तालमीसाठी तसेच तयारी करण्यासाठीही त्याच्याकडे वेळ होता. मात्र गेल्याच महिन्यात त्याच्या श्रीमंत घरची सून या नव्या मालिकेचे शूटिंग सुरू झाल्यानंतर मात्र त्याची चांगलीच धावपळ सुरु झाली.

श्रीमंत घरची सून ही मालिका नुकतीच सुरु झाली आहे. या मालिकेत रुपल नंद आणि यशोमान आपटे एकत्र काम करत आहेत. यापूर्वी आनंदी हे जग सारे या मालिकेतही रुपल सोबत त्याची जोडी पडद्यावर पाहायला मिळाली होती तर फुलपाखरू या मालिकेत देखील रूपल होती. मात्र तिची भूमिका खल नायिका असल्यामुळे पडद्यावर नेहमी खुन्नस करताना दिसत होते. मात्र आता नव्या मालिकेत त्यांची केमिस्ट्री छान झालेली आहे.

श्रीमंताघरची सून ही मालिका नव्यानेच सुरू झाल्यामुळे सध्या मालिकेचे शूटिंग जोरात सुरू झाले . आणि याच दरम्यान यशोमानचा सहभाग असलेला सिंगिंग स्टार हा शो आता चांगलाच रंगतदार वळणावर आलेला आहे. यशोमान सांगतो, गाणं हे माझं खूप वर्षापासूनच स्वप्न आहे. एरवीदेखील मी जेव्हा जेव्हा काही शूट करत असतो किंवा ट्रीपला गेलो , कुठेही फिरायला गेलो की त्यातून मिळणारा रिकाम्या वेळेत मी गाण म्हणतो. वेगवेगळी गाणी ऐकणं आणि ती स्वतः जाऊन बघणे याची मला खूप आवड आहे. आणि माझ्या सुदैवाने फुलपाखरू या मालिकेत गाण्याची संधी मला मिळाली त्यामुळे माझ्या चाहत्यांना माझ्या गाण्याविषयी समजलं त्यामुळे मला नेहमीच कुठल्या कार्यक्रमाला गेल्यानंतर सुद्धा एखादा डायलॉग म्हणण्याचा आग्रह करण्याऐवजी एखाद्या गाण्याचा आग्रह केला जातो ते खूप आवडतं.

सिंगिंग स्टार या शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर जेव्हा आली तेव्हा माझ्या गाण्याच्या प्रेमापोटीच मी ती स्वीकारली कारण मलादेखील यातून खूप शिकायला मिळणार होतं. प्रशांत दामले, सलील कुलकर्णी, बेला शेंडे यांच्यासारखे गाण्यातली बाप परीक्षक म्हणून समोर होते. शिवाय अनेक कलाकार हे शास्त्रशुद्ध पद्धतीने गाणं शिकलेले आहेत असेच स्पर्धक सहकारी म्हणून या शोमध्ये माझ्यासोबत आहे त्यामुळे मला या कार्यक्रमांमध्ये खूप काही शिकता आले. श्रीमंताघरची सून ही मालिका करत असलो तरी सिंगिंग स्टार शो मध्ये बेस्ट द्यायचा आहे हे मला विसरून चालणार नाही. म्हणूनच श्रीमंताघरची सून या मालिकेच्या सेटवर रिकामा वेळ मिळतो तेव्हा, एखादी शांत जागा बघतो किंवा मेकअप रूम असते किंवा जिन्याची पायरी देखील मला चालते आणि तिथे मी हेडफोन घालून माझ्या मोबाईल मध्ये मी गाण्याची तयारी करतो अनेकदा असंही होतं की यशोमानला मालिकेच्या शूटिंग मधून गाण्याच्या रियाजसाठी वेळच मिळत नाही मग अशा वेळेला पैकअप झाल्यानंतर तो घरी प्रॅक्टिस करतो. यामुळे नक्कीच सध्यातरी यशोमान प्रचंड बिझी झालेला आहे .

लॉक डाऊन मध्ये असलेले एकदम शांत आणि निवांत आयुष्य बिझी झाल्यामुळे तो देखील खूप खूश आहे. एकीकडे श्रीमंता घरची सून मालिकेतला अथर्व आणि दुसरीकडे सिंगिंग स्टार मधला खराखुरा गायक यशोमान या दोघांची भूमिका निभावण्यात यशोमान रमला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER