ऋतुराज पाटील यांनी सतेज पाटील यांनाच निवडले

अहमदनगर :-  येथील युवा संवाद कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांचा रॅपिड फायर राऊंडमध्ये काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील पेचात पडले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यापैकी कोण अधिक मुरब्बी कोण? असा प्रश्न विचारला. यात ऋतुराज यांच्यात त्यांनी कोणाची निवड करतील, याची उत्सुकता होती. क्षणाचाही विचार न करता सतेज पाटील यांना निवडले.

संगमनेरमध्ये आज, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने युवा आमदारांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, झिशान सिद्दीकी आणि ऋतुराज पाटील सहभाग झाले होते. राज्यातील तरुण आमदार आणि मंत्र्यांची ही फळी पहिल्यांदाच सभागृहात आली आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. आणखी वाचा – ‘हॅलो मोदीसाहेब रोहित पवार बोलतोय, नाव ऐकलचं असेल’ रॅपिड फायर राऊंड अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमाप्रमाणं इथही रॅपिड फायर राऊंड केला. त्यात प्रत्येक नेत्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. सुरुवात ऋतुराज पाटील यांच्याकडूनच झाली. बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात मुरब्बी कोण आहे? या प्रश्नावर ऋतुराज पाटील यांनी ‘बंटी काका’ असं उत्तर दिलं. अवधूतनं मासा की तांबडा रस्सा, असा प्रश्न विचारला होता. त्यात ऋतुराज यांनी अर्थात तांबडा रस्सा निवडला. कॉलेजचं आयुष्य की आमदार की? या प्रश्नावर त्यांनी, ‘आमदारकीमध्ये काम करायला मिळतं, त्यामुळे आमदारकी निवडतो,’ असं उत्तर दिलं. पत्नी पूजाला केला फोन अवधूत गुप्ते यांच्या खुपते तिथं गुप्ते या कार्यक्रमातील एका सेगमेंटप्रमाणे, या कार्यक्रमातही ‘मॅजिक फोन’ देण्यात आला होता. यात एखाद्या व्यक्तीला फोन केल्याचं दाखवून, त्याला आजवर जे बोलता आलेलं नाही, ते बोलायचं, अशी अटक होती. ऋतुराज पाटील यांनी पत्नीला फोन केला आणि ‘लग्नानंतर निवडणुकीमुळं तुला वेळ देता आला नाही, आता तुला वेळ देईन’, अशी ग्वाही दिली.