फोगाट बहिणींतील रितिका फोगाटची पराभवाच्या निराशेत आत्महत्या

Ritika Phogat commits suicide

‘दंगल’ गर्ल (Dangal Girl) म्हणून प्रसिध्द पावलेल्या फोगाट बहिणीच्या कुटुंबातील अवघ्या 17 वर्षांची सदस्य रितिका फोगाट (Ritika Phogat) हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दुःखाची बाब म्हणजे ज्या कुस्तीला (Wrestling) फोगाट कुटुंबाने आयुष्य समर्पित केले त्याच कुस्तीच्या एका स्पर्धेतील अंतिम लढतीत पराभव झाल्याचे वाईट वाटून रितिकाने हे टोकाचे पाऊल उचलले. आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या भारताच्या नावाजलेल्या मल्ल गीता (Geeta Phogat) व बबिता फोगाट (Babita Phogat) यांची रितीका ही मामबहिण होती. तिने सोमवारी रात्री गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.

राज्य स्तरीय सब ज्युनियर कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत रितिका पराभूत झाली होती. त्याचे वाईट वाटून तिने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. आपले फूफा महावीर फोगाट यांचे गाव बलाली येथे तिने स्वतःला फास लावून घेतला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, रितीका ही गेल्या पाच वर्षांपासून आपले फूफा महावीर फोगाट यांच्याकडून कुस्तीचे धडे घेत होती. तिने 12 ते 14 मार्चदरम्यान भरतपूर येथील राज्यस्तरीय सब ज्युनीयर स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेच्या विजेतेपदाची लढत 14 मार्चला झाली. त्यात रितीका पराभूत झाली होती. त्याच्या निराशेत तिने गळफास लावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार महावीर फोगाट हेसुध्दा त्या स्पर्धेवेळी उपस्थित होते.आणि रितीकाने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली होती पण पराभवानंतर तिने ओढणीने आयुष्य संपवले. 53 किलोगटाची अंतिम लढत तीफक्त एका गुणाने हारली होती.

रितिका ही मूळची राजस्थानच्या झुनझुनू जिल्ह्यातील जैतपूरची रहिवासी आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून ती हरियाणातील महावीर फोगाट स्पोर्टस् अकॕडेमीत प्रशिक्षण घेत होती. हरियाणातील चारखी दादरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक रामसिंग बिश्नोई यांनी याप्रकरणी चौकशीला सुरुवात करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार रितिकाचा 17 मार्च रोजी आत्महत्येने मृत्यू ओढवला. हरियाणाचे परिवहन व महामार्ग राज्यमंत्री विजयकुमार सिंग यांनी आत्महत्येच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यांनी या संदर्भात व्टिट करताना म्हटलेय की, उज्ज्वल भविष्य असलेल्या रितिका फोगाटला गमावल्याची दुःखद वार्ता आली आहे. गेल्या काही दिवसात आयुष्य फार बदलले,आहे. खेळाडूंवर प्रचंड दडपण आहे. ते तणावात असतात असे पूर्वी नव्हते. या ताणतणावांना सामोरे कसे जायचे हेसुध्दा त्यांना शिकवायला हवे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER