अजित दादा, मी सदैव आपला आभारी राहीन – रितेश देशमुख

मुंबई : मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गाला (इस्टर्न फ्री वे)ला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव दिलं जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. यासंदर्भात विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख याने एक ट्विट करत अजित पवारांचे आभार मानले आहेत.

मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आल्याने रितेश भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय. तो ट्विटच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. श्री विलासराव देशमुखजी यांनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला, त्या बद्दल – मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन, अजित दादा, असं रितेश देशमुख म्हणाला आहे.

दरम्यान, विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच ‘इस्टर्न फ्री वे’च्या उभारणीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन ‘इस्टर्न फ्री वे’ला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागाला दिल्या आहेत.