माजी मुख्यमंत्री विलासरावांवर चित्रपट; रितेश देशमुखला प्रतीक्षा संहितेची!

Ritesh Deshmukh-Vilasrao Deshmukh

पुणे :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी त्यांचा सुपुत्र आणि प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख अत्यंत उत्सुक आहे.

मी या चित्रपटाची निर्मिती लवकरच करेन, असे रितेशने म्हटले आहे. विलासरावांचे आयुष्य दोन तासांमध्ये पडद्यावर मांडणे, माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक आहे, असे रितेश देशमुखने पुणे येथील एका कार्यक्रमात सांगितले.

यावेळी बोलताना रितेश म्हणाला, सरपंचपदापासून केंद्रीय मंत्री होण्यापर्यंत विलासरावांचा प्रवास झालेला आहे. चित्रपट बघितल्यावर लोकांनी असेही म्हणायला नको की, मी फक्त विलासरावांच्या चांगल्याच गोष्टी दाखविल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटासाठी योग्य संहिता मिळण्याची मी वाट बघत आहे!


Web Title : Ritesh awaits script for film on vilasrao deshmukh

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Pune City, Nagpur City, Thane City, Mumbai City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)