माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशचा भावनिक व्हिडीओ

riteish-shares-an-emotional-video-on-father vilasrao-deshmukh

मुंबई :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज (२६ मे) ७५ वी जयंती. वडिलांच्या जयंतीनिमित्त अभिनेता रितेश देशमुख याने एक भावनिक व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. विलासरावांच्या पोशाखाला बिलगून रितेश त्यांचं अस्तित्व जाणवून घेताना दिसत आहे.

“अभी मुझ में कही बाकी है थोडीसी जिंदगी” या गाण्याच्या पार्श्वभूमीवर रितेशने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या अखेरीस विलासरावांचा फोटोही दिसतो. तर रितेश आणि विलासरावांचा एक पाठमोरा फोटोही यामध्ये आहे. रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना तुमची नेहमी आठवण येते, असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER