
बॉलिवूडमधील ज्या काही अत्यंत लोकप्रिय जोड्या आहेत त्यामध्ये रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) आणि जेनेलिया डिसूझा (Genelia dsouza) यांची जोडी वरच्या क्रमांकावर आहे. हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. दोघेही एकमेकांचे आणि घरातील मुलांसोबतचे वा एकमेकांचे अनेक मजेदार व्हीडियो सोशल मीडियावर शेअर करीत असतात. या दोघांची केमिस्ट्री खूपच चांगली आहे. दोघांचे व्हीडियो आणि वागणे बघितले की खरोखरच हे दोघे एक दूजे के लिएच बनले आहेत असे वाटते. जेनेलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हीडियो शेअर केला आहे. हा व्हीडियो खूपच व्हायरल झाला असून यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. या व्हीडियोमध्ये रितेश देशमुख अभिनेत्री प्रीती झिंटाची (Preity Zinta) गळाभेट घेतल्यानंतर तिच्या हाताचा चुंबन घेताना (Riteish Deshmukh kissed Preity Zinta) दिसत आहे. मागे जेनेलिया उभी राहून हे पाहाताना दिसते आणि त्यानंतरच्या व्हीडियोत ती रितेशचे जे काही हाल करते ते पाहाण्यासारखे आहेत. त्यामुळेच हा व्हीडियो प्रचंड व्हायरलही झाला आहे.
रितेश आणि जेनेलियाने तुझे मेरी कसम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच सिनेमात दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले आणि २०१२ मध्ये या दोघांनी लग्नही केले. या दोघांना रियान आणि राहिल अशी दोन मुलेही आहेत. काही दिवसांपूर्वीच जेनेलियाने सोशल मीडियावर एक व्हीडियो शेअर केला होता. या व्हीडियोत जेनेलियाच्या हाताला प्लॅस्टर लावलेले दिसत असून रितेश जेनेलियाचा हेअर ड्रेसर बनून तिचे केस विंचरताना दिसत होता. हा व्हीडियोही सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला होता. आणि आता जेनेलियाने दोन व्हीडियो एकत्र करून सोशल मीडिया यूजर्झचे मनोरंजन केले आहे.
रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर एकमेकांवरचे प्रेम दर्शवतानाच एकमेकांची टांग खेचतानाही अनेकदा दिसतात. हा व्हीडियोही त्याच कॅटेगरीतील आहे. जेनेलियाने दोन व्हीडियो जोडून एक व्हीडियो बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जेनेलियाने रितेश प्रीती झिंटाच्या हाताचा किस घेतानाचा व्हीडियो आयफा पुरस्काराच्या वेळेचा आहे. या व्हीडियोनंतर लगेचच जेनेलियाने दुसरा व्हीडियो जोडला आहे. या व्हीडियोत जेनेलिया रितेश देशमुखला मारताना दिसत असून रितेश देशमुख हात जोडून तिची माफी मागत असल्याचे दिसत आहे. तसेच बॅकग्राऊंडला ‘तेरा नाम लिया, तुझे याद किया…’ गाणेही ऐकायला मिळत आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या या व्हीडियोला प्रचंड लाईक्स तर मिळालेच आहेत अनेकांनी प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला