औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे..; रितेश देशमुख संतापला

Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे गेल्या काही आठवड्यांपासून करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे काहींना ऑक्सिजन आणि बेड्स मिळतं नाही आहेत. एवढंच नाही तर रेमडेसिवीर लसींचा तुटवडा जाणवत असल्याने या लसींचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु (Selling fake drugs on coronavirus)झाला आहे.

या प्रकरणावर मराठमोळा अभिनेता ‘रितेश देशमुख’ चांगलाच संतापला आहे. यासंदर्भात रितेशने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट सुद्धा केले आहे. रितेश आपल्या ट्विट मध्ये म्हणतो कि… ‘औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे’ या आशयाचे ट्विट त्याने केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button