अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलियाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

Riteish-Deshmukh

मुंबई : सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. या साऱ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आणि अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यातच आता बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जेनेलिया या दोघांची भर पडली आहे . दोघांनीही पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा २५ लाखांचा चेक सोपवला आहे.

ही बातमी पण वाचा :- लानत है उनपर, जिनके पास दानत नही है…; मनसेनं बॉलिवूड कलाकारांना फटकारलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आपल्या ट्विट अकाऊंटच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलियाने केलेल्या मदतीची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करताना लिहिलं आहे की, “रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचे योगदान दिले. मी त्यांचा आभारी आहे!”, असे मुख्यमंत्री म्हणाले .

महाराष्ट्राच्या काही भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही . मात्र कोल्हापूर व सांगली सारख्या जिल्ह्याचे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. पूरपरिस्थितीशी नागरिकांचे संघर्ष सामना असतानाच सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. विविध यंत्रणांनी या दोन्ही जिल्ह्य़ातून दोन लाखांहून अधिक नागरिक आणि 22 हजार जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.