खाद्यतेल दरात वाढ तर डाळींच्या किमतीत घट

Rising edible oil prices and declining pulses prices

नवी दिल्ली :-खाद्यतेलाच्या किमतीमध्ये गेल्या वर्षभरात ३३ टक्क्यांनी वाढ झाली असून, दिवाळीच्या आधी गगनाला भिडलेले डाळींचे भाव मात्र २५ ते ३० रुपयांनी कमी झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किमतीत सातत्याने वाढ झाली आहे. सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन, मोहरी, वनस्पती अशा सर्वच प्रकारच्या तेलाच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांनी तेलाचे उत्पादन कमी झाल्याने तेथील वाढ झाली आहे. खाद्यतेलाचे वाढते दर सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मध्यंतरी कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.

३० हजार टनांची आयात करण्यात आल्यानंतर कांद्याचे दर उतरले होते. कांद्याचे दर स्थिर असले तरी बटाटा व खाद्यतेलाचे दर मात्र वाढतच चालले आहेत. मोहरीच्या तेलाचा प्रतिलिटर दर १२० रुपयांवर पोहचला असून, गतवर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हे दर १०० रुपयांच्या आसपास होते. गतवर्षी ७५ रुपयांच्या समीप असलेले वनस्पती तेलाचे दर आता १०२ रुपयांवर गेले आहेत. याच प्रकारे सोयाबीन तेलाचे दर ९० रुपयांवरून ११० रुपयांवर गेले आहेत. सूर्यफूल आणि भुईमूग तेलाचे दरही गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. मलेशियातील पाम आयात घटली आहे.

याचा परिणाम अन्य प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरवाढीवर झाला आहे. देशात जवळपास ७० टक्के पाम तेलाचा उपयोग फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये केला जातो. दिवाळीच्या आधी गगनाला भिडलेले डाळींचे भाव आता कमी झाले आहेत. परदेशातून आयात वाढल्याने किमती कमी झाल्या आहेत. येत्या एक-दीड महिन्यात पीक हाती आल्यावर दरात अजून घसरण अपेक्षित आहे. तूरडाळ १३० रुपायांवर गेली होती. दिवाळीतही डाळी भडकलेल्याच होत्या. मात्र, आता दिवाळीनंतर डाळींची आवक वाढली आहे. परदेशातून डाळींची आयात वाढल्याचा हा परिणाम आहे. अनलॉकमध्ये ब्राझील, मलेशिया, कॅनडा, आफ्रिका, इस्रायलमधून डाळींची आवक वाढली आहे. १५ दिवसांपूर्वी तूरडाळ १३० रुपयांवर होती, ती आता ९० रुपयांच्या खाली आली आहे. मूग, मसूर, उडीद, चणा डाळींचा दरही या पटीतच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER