वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे काळ्या पैशांत घट : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली :  तंत्रज्ञानामुळे सामान्य माणूस आणि सरकार यातील दरी कमी झाली आहे. तसेच वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे (Rising digital transactions) काळा पैसा घटला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. यावेळी ‘नास्कॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम’ यांना मोदींनी संबोधित केले. यावेळी आयटी सेक्टरचे उपयोग सांगत कौतुकदेखील केले. सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेकडो सरकारी सुविधा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत, असेही मोदी यांनी सांगितले. या तंत्रज्ञानाने सरकारी कामात पारदर्शकता आणली आहे.

तंत्रज्ञानाद्वारे पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रकल्प ओळखले जात आहेत. तसेच यावर ड्रोनच्या मदतीने देखरेख ठेवली जात आहे. जेणेकरून प्रकल्प वेळेत पूर्ण केले जाऊ शकेल. यामुळे मानवी दखल कमी आहे. कोरोना संकटात या तंत्रज्ञानाने पुन्हा एकदा आपले पराक्रम दाखवले आहेत. काही महिन्यांपूर्वी आपण लसींसाठी इतरांवर अवलंबून होतो. मात्र, भारताने आता विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे स्वतःची कोरोना लस तयार केली आणि कित्येक देशांना ही लस पुरवली जात आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.

लाखो रोजगाराच्या संधी

आयटी सेक्टरने ४ बिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. या कालावधीत लाखो जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. आयटी क्षेत्र हा भारताच्या विकासाचा मजबूत आधारस्तंभ असल्याचे सिद्ध झाले, असे मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER