कोरोना मृत्युचे वाढते प्रमाण चिंताजनक : औरंगाबाद जिल्हाधिकारी

३१ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये कोणतेही बदल नाही

Aurangabad Collector

औरंगाबाद : कोरोनामुळे मृत्युचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे मत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केले. शहरातील ५४ व ग्रामीण मधील १ असे एकूण ५५ मृत्यू कोरोनामुळे झाले. पॉझिटीव्ह रूग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ४ टक्के आहे. ०.२५ टक्क्यापर्यंतच मृत्युदर असणे गरजेचे आहे. मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने चिंतेचा विषय आहे. नवीन रूग्ण सापाडण्याचे प्रमाण कमी होत असले तरी सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. रूग्णाचा मृत्यू होणे म्हणजे त्यामागील परिस्थिती चिंताजनक असते. स्वॅब तपासणी, रूग्णांचा शोध घेण्याची गती वाढत असून सध्या तरी शहर व जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात दिसते आहे. असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला.

अंगावर आजार काढू नये : घाटीतील रूग्णसेवा चांगली नसल्याबाबत तक्रारींच्या अनुषंगाने कोविड वॉर्डाची गुपचूप पाहणी केली. घाटीमध्ये रूग्णांची हेळसांड होत आहे असे काही जाणवले नाही. त्यामुळे लक्षणे असलेल्या नागरीकांनी घाटीमध्ये उपचारासाठी यावे अंगावर आजार काढून नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. प्रत्येक गंभीर रूग्ण दगावतातच असे नाही, ५४ टक्के रूग्ण आजवर बरे हाेऊन घरी गेल्याचे ते म्हणाले.

३१ मे पर्यंत लाॅकडाऊन मध्ये होणार नाही बदल : ३१ मे पर्यंत लॉकडाऊनमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. जिल्ह्यासाठी जे आदेश काढण्यात आले आहेत त्यानुसार सर्व काही चालू – बंद राहील. तसेच २९ मे नंतर मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याबाबत निर्णय होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER