न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावरील उपचारानंतर ऋषी कपूर मायदेशी

Rishi Kapoor

मुंबई :- वर्षभरापूर्वी अभिनेता ऋषी कपूर हे कर्करोगावरील उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते. उपचार संपवून ते आता मायदेशी परतले आहेत. १० सप्टेंबर रोजी (आज) पहाटे २.४५ वाजता कपूर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. ऋषी कपूर यांनी दीड महिन्यांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते कर्करोगावर उपचार घेत असल्याचे सांगितले होते. ऋषी व नितूसिंग दोघेही मुंबई एअरपोर्टवर उतरताच मीडियाने कॅमेऱ्यामध्ये त्यांना कैद केले. यावेळी ऋषी कपूर यांच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता.

ही बातमी पण वाचा : अक्षय कुमारचा ट्रोलर्सवर पलटवार, 21 वर्षाखालील मुलांना अर्वाच्य शब्दांतून ट्रोल करणे बेकायदेशीर असावे

घरी परतल्यावर ऋषी यांनी ट्विटरवरून सर्वांचे आभार मानले. ‘घरी परतलो. ११ महिने ११ दिवस. तुम्हा सर्वांचे खूप आभार’ असे त्यांनी लिहिले. वर्षातून किंवा दीड वर्षातून एकदा तपासणीसाठी न्यूयॉर्कला जावे लागेल. मुंबईत परतल्यानंतर ते १५ दिवस विश्रांती घेणार आहेत  आणि त्यानंतर सप्टेंबरअखेर चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचेही ते म्हणाले .