रिषभ पंतचा स्पायडर मॅन पुन्हा एकदा चर्चेत

भारतीय क्रिकेट संघ सध्या सामने खेळत नसला तरी रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या चर्चेत आहे. तो घर शोधत असल्याची पोस्ट गुरुवारी व्हायरल झाली होती आणि चाहत्यांनी त्याला भन्नाट सल्ले दिले होते. त्यानंतर आता त्याची ‘स्पायडर मॅन ‘(Spider Man) गाण्याबद्दलच्या आधीच व्हायरल झालेल्या पोस्टबद्दलची प्रतिक्रिया देणारी पोस्ट व्हायरल होत आहे.

या ताज्या पोस्टमध्ये त्याने म्हटलेय की, असे दिसतेय की स्टम्पच्या मागे मी म्हटलेल्या छोट्याशा गाण्याने चांगलेच जाळे विणलेले दिसतेय. या ई- स्पायडरमॕनच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व पोस्ट बघून आनंद होतोय. येऊ द्या!

Looks like my little song behind the stumps has cast quite the web! Loving all the (e)Spiderman references, keep them coming 🕸️
#RP17 https://t.co/N2YWcYBX6c

ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत असताना यष्टीरक्षण करताना रिषभ पंत हे गाणे (स्पायडर मॅन, स्पायडर मॅन …तुने चुराया मेरा दिल) गुणगुणला होता आणि त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. हे गाणे म्हणताना स्पायडरमॕन जसे खलनायकांविरुध्द जाळे विणून त्यांना नामोहरम करतो तसे वॉशिंग्टन सुंदरनेसुध्दा आॕस्ट्रेलियन फलंदाजांविरुध्द आपल्या फिरकीचे जाळे टाकावे असे त्याने अप्रत्यक्षपणे सुचवले होते.

रिषभ पंतच्या त्या व्हायरल पोस्टची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) नेही दखल घेतली होती आणि आयसीसीने त्यावर एक कविता बनवली होती. ती कविता किंवा गाणे असे होते…

“Spider-Pant, Spider-Pant!
Does whatever a spider can.
Hits a six, takes a catch.
Guiding India to the match.
Look out! Here comes the Spider-Pant,”

दरम्यान, रिषभने घर शोधण्यासाठी मदत करा ही जी पोस्ट केली होती त्याला विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत उत्तर दिले आहे. सेहवागने म्हटलेय की तसे तर इंग्लंडचे गोलंदाज तुला भरपूर जागा देतील, त्यांच्यासोबत तर खेळपट्टीवर तू घर बनवशीलच याचा मला विश्वास आहे.बाकी घरच्यांसाठी प्राॕपर्टीचा बेस्ट आॕप्शन हाऊसींग संकेतस्थळावरच आहे.

या सल्ल्यासाठी विरुला धन्यवाद देताना रिषभने म्हटलेय की, धन्यवाद विरेंद्र सेहवाग भैया. राजकुमार राव प्रमाणेच घर तर हाऊसिंग डाॕट काॕमवर सहज मिळाले, आता तर इंग्लंडविरुध्दची मालिका जिंकायची तयारी सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER