रिषभ पंतची धोनीशी तुलना, माहीचे फॅन्स होतील नाराज!

Sourav Ganguly - MS Dhoni - Rishabh Pant

मुंबई : भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतने (Rishabh Pant) भारतीय संघात पदार्पण केल्यापासून त्याची टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी (Mahendra Singh Dhoni) तुलना होत आहे. पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्यावेळी धोनीदेखील भारतीय संघाकडून खेळत होता. वनडे आणि टी-२० मध्ये पंतला यश प्राप्त झाले नसले तरी कसोटी क्रिकेटमध्ये पंतने शानदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) विरुद्धच्या मालिकेत पंतने केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

गांगुली म्हणाले की, “रिषभ पंत हा जवळपास धोनीसारखाच खेळाडू आहे. तो सामना जिंकणारा खेळाडू आहे. तो विरोधी संघाच्या हातात असलेला सामना केव्हाही खेचून आणू शकतो. तो अविश्वसनीय फटके लगावतो. पंत आपल्या संघाला सामना जिंकविण्याची जिद्द ठेवतो. मग तो कसोटी सामना असो, एकदिवसीय असो किंवा टी-२० असो. तो काही मिनिटांत सामन्याचे रूप पालटू शकतो.” असा कौतुकाचा वर्षाव गांगुलीने पंतवर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER